छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्वचारोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन

भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा चिटणीस श्री . वैभव मधुकर झोटिंग आणि फिनिक्स स्किन , हेअर , लेझर क्लिनिक चे डॉक्टर राजीव सूर्यवंशी यांच्या संयुक्त विद्यमाने

प्रतिनिधी :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त , भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा चिटणीस श्री . वैभव मधुकर झोटिंग आणि फिनिक्स स्किन , हेअर , लेझर क्लिनिक चे डॉक्टर राजीव सूर्यवंशी यांच्या संयुक्त विद्यमाने त्वचारोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबीर आयोजित केले आहे . दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या शिबिरात नोंदणी करणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे .यापुढे शिवजयंती व इतर राष्ट्रीय निम्मित  शिबिराचे आयोजन असणार आहे . असे  डॉ सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले .
 यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट ( केशरोपण ) , स्किन ग्राफ्टिंग ( त्वचारोपण ) , पांढऱ्या डागांवरील शस्त्रक्रिया चेहऱ्याच्या कपड्यांवरील शस्त्रक्रिया , स्किन पॉलिशिंग , मस , तीळ , चामखीळ काढणे , व्रणाची दुरुस्ती , नखांच्या सर्व शस्त्रक्रिया आजारांवरील विविध शस्त्रक्रिया उपलब्ध असणार आहेत .
सदर शिबिर शनिवारी 19 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी बारा ते संध्याकाळी पाच या वेळेतच घेतले जाणार आहे .   शस्त्रक्रिया त्या दिवशी व इतर पुढील तीन दिवसात केल्या जातील . या शिबिराचे उदघाटन डॉक्टर राजीव सूर्यवंशी त्वचारोगतज्ञ हे करतील . आणि या कार्यक्रमासाठी भाजप जिल्हा शहराध्यक्ष श्री महेंद्र उर्फ भय्या गंधे , भाजप युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष श्री महेश तवले , युवा नेते श्री वैभव झोटिंग आणि आणि डॉ . योहान सय्यद यांची सन्माननीय उपस्थिती राहील अशी माहितीही फिनिक्स स्किन हेअर लेझर क्लिनिक चे जनसंपर्क अधिकारी श्री रवी कुमार सरडे यांनी दिली . या शिबिरात लेझर प्रणालीवरील आधारित शस्त्रक्रियावर कोणतीही सवलत उपलब्ध नसेल आणि रुग्ण नोंदणीसाठी नियम व अटी लागू असतील याची नोंद घेण्याचे आव्हान हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे .