जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

अहमदनगर; जिल्ह्यात आठ ते 10 जून व 12 जून 2023 या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा तसेच 11 जून रोजी वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाल्याने नगरकर अस्वस्थ झाले आहेत तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पाऊस उशिरा होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.