झेंडीगेट हनुमान मंदिरात रामदास कावट यांचा सत्कार

संन्यासी वृत्तीने, श्रद्धेने हनुमंतरायाची साधना, उपासना करणारे श्री कावट यांनी मंदिराच्या स्वच्छतेपासून दैनंदिन कार्यक्रमाची सर्वप्रकारची देखभाल प्रामाणिकपणे,तन मन धनाने करून हनुमानाचे निस्सीम भक्त असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केल्याचे त्याच बरोबर जिल्हा बँकेतील नौकरीही निष्ठेने केली असे प्रतिपादन रामप्रसाद हेडा यांनी केले.  झेंडीगेटच्या शिवकालीन जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी व देवस्थान प्रमुख रामदास कावट यांचा जिल्हा सहकारी बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल भक्तमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सुरेश झंवर,आसाराम धाडगे,रामप्रसाद हेडा,राजेश सटाणकर,शिवनारायण वर्मा,विजय खंडेलवाल,कैलास मोकाटे,पापालाल लढ्ढा, विजय इथापे, राजी आखमोडे आदी भक्तगण उपस्थित होते.

जिल्हा सहकारी बँकेत रामदास कावट यांनी नौकरी अत्यंत प्रामाणिक पणे केली.प्रपंचाचीही जबाबदारी पेलतांना कधीकाळी घराकडे दुर्लक्षही झाले,मात्र नौकरीत आणि हनुमंताच्या उपासनेत त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. चांगलं काम करणाऱ्याची म्हणे परमेश्वर परीक्षा घेतो तसा अनुभवही त्यांच्याकडे आहे. चांगले काम करणाऱ्यां बरोबरच त्रास देणारेही असतात.हा त्रास बऱ्याच वेळा एकट्यालाच सहन करावा लागतो तसाही त्यांचा अनुभव आहे.असे शिवनारायण वर्मा यांनी सांगितले. श्री.कावट यांच्या बद्दल जिल्हा सहकारी बँकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामा बद्दल सातत्याने समाधान व्यक्त केल्याने त्यांना मंदिरात उपासना,सेवा देणे सहज शक्य झाले.परिवारानेही सेवेसाठी सहकार्य केले हि सकारात्मक बाब आहे. आज सेवा निवृत्तीनंतर हनुमान मंदिर सेवेत अधिक रमतील या बद्दल कोणालाही शंका नाही असे सुरेश झंवर यांनी सांगितले.स्वागत विजय खंडेलवाल यांनी तर  प्रास्ताविक  अमोल भांबरकर यांनी केले. शेवटी राजेश सटाणकर यांनी आभार मानले.