टीईटी घोटाळा : एजंट सौरभ त्रिपाठी ने तयार केली ६०० परीक्षार्थींची यादी

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एजेंड सौरभ महेश त्रिपाठी (३९ ) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस जे डोलारे यांनी त्याला ३० डिसेम्बर पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे . अपात्र ठरलेल्या ५५०ते ६०० विध्यार्थीची यादी त्रिपाठी याने इतर साथीदारांचा मदतीने तयार केल्या असल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजय सिंह यादव यांनी न्यायालयाला दिली . त्रिपाठी चा या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्या नंतर सायबर पोलिसांनी त्याला लखनौ येथून अटक करत न्यायालयात हजर केले . अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती .