दक्षता पथकाने केली विनामास्क दंडात्मक कारवाईसह चायना, नायलॉन मांजा तपासणी !

अहमदनगर येथील महानगरपालिका दक्षता पथकांच्या वतीने बागडपट्टी, तोफखाना, चितळे रोड परिसरातील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच पतंगांच्या स्टॉलवर चायना आणि नायलॉन मांजा बाबतची तपासणी करण्यात आली.

या कारवाईसाठी मनपा दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांच्यासह नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेंद्र बोरुडे, अमोल लहारे, विष्णू देशमुख, राजू जाधव, भास्कर आकुबत्तीन, गणेश वरुटे, रिजवान शेख, विष्णू मिसाळ, नंदकुमार रोहकले, भीमराज कांगुडे, गणेश धाडगे, अनिल कोकणे उपस्थित होते.