दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानचे शहरासह नगर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचा समावेश कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे -अंकुश शेळके
अहमदनगर (प्रतिनिधी)- दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मा.कै. खा. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खारेकर्जुने ग्रामस्थ व नगर तालुक्यातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंकुश शेळके म्हणाले की, राजकारण करताना मा.कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे. राजकारणापेक्षा गरजूंना आधार देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य शेळके कुटुंबीय करत आले आहे. सामाजिक भावनेने प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
