दिव्यांगांना सहाय्यक साधन वाटपसाठी बुधवारी शहरात नाव नोंदणी शिबीराचे आयोजन

दिव्यांग बांधवांना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी कृत्रिम सहाय्यक साधने उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परीषद, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्यासंयुक्त विद्यमाने बुधवार दि.29 डिसेंबर रोजी टिळकरोड येथील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयात सहाय्यक साधन वाटप नाव नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सहभाग नोंदवून आवश्यक साधनासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केले आहे.
दिव्यांग बंधु भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग असल्याने त्यांचे जीवन काहीसे परावलंबी असते, यावर मात करण्यासाठी शिबीराच्या माध्यमातून दिव्यांगांना कृत्रिम सहाय्यक साधने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर शिबीरामध्ये शारीरीकदृष्टया दिव्यांग असलेल्या व्यक्तीस तीन चाकी सायकल, व्हिलचेअर, एल्बो कुबडी, कुबडी, काठी, कृत्रीम अवयव, कॅलीपर, सेरेब्रल पाल्सी खुर्ची, अंध व्यक्तीसाठी ब्रेल किट (शाळेतील मुलांसाठी), डैसी प्लेअर (पुस्तक वाचण्यासाठी), मोबाईल फोन, अंध काठी, कर्णबधिरासाठी श्रवण यंत्र, मतिमंदासाठी मतिमंद किट (14 वर्षाखालील), मोटारचलित तीनचाकी सायकल आदी साहित्याची वाटप होण्याकरिता नोंदणी होणार आहे. नोंदणी शिबिरासाठी दिव्यांग प्रमाणपत्र (एसएडीएम), आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो, उत्पन्न दाखला आदीची छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे. त्याच बरोबर कोव्हीड बाबत शासनाच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे प्रत्येक दिव्यांगाबांधवाना बंधनकारक राहणार आहे. अधिक माहितीसाठी बाबासाहेब महापुरे मो.नं. 7875855959, चांद शेख मो.नं. 8237968786, बाहुबली वायकर मो.नं. 7507678855 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.