देशपातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेत नगरच्या दादा शिंदेचे घवघवीत यश

नुकत्याच तेलंगना येथे झालेल्या मिस्टर इंडिया 13 व्या राष्ट्रीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचा खेळाडू दादा शिंदे हा 80 किलो वजनी गटात पाचवा क्रमांक मिळवून त्याने अहमदनगेरचे नाव देशपातळीवर चमकावले आहे.

स्पर्धेसाठी डॉ.समर रणसिंग, अक्षय कर्डिले, अफजल शेख यांनी दादा शिंदे यांना मोलाचे सहकार्य केले. दादा शिंदेच्या यशाबद्दल त्यांचे जिल्हा शरीर सौष्ठव असोसिएशनचे संस्थापक मधुकर गायकवाड, अध्यक्ष जितेंद्र भिंगारदिवे, मनोज गायकवाड, सचिव डेव्हीड मकासरे, पॉवर लिफ्टिंग असो.चे मयुर दरंदले, सतीश रासकर, कैलास रणसिंग, अजित गायकवाड, सुरेंद्र बोराडे, प्रतिक पाटील, राहुल कुुलकर्णी, राहुल पैलवान, शब्बीर अन्सार सय्यद, हनिफ शेख, सागर शिंदे, सुरज पर्वते, अक्षय कांबळे, किशोर वारे, कोच सौरभ बल्लाळ व संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.