नगरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

अहमदनगर: डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात दहा ते पंधरा जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे व उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत शेळके यांनी केले आहे. या शिबिरात गुडघे प्रत्यारोपण, खुबे प्रत्यारोपण, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच मधुमेह. कावीळ यकृताचे आजार हृदयविकार, उच्च रक्तदाब, दमा, फुफुसांचे आजार, बालकांचे व महिलांचे आजार, थायरॉईड, किडनी, अस्थिरोग टी.बी., दंतररोग आदी आजारासंबंधी तपासण्या केल्या जाणार आहेत.