नगरसेविका वंदना ताठे व नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहा येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन चा शुभारंभ संपन्न

नगरसेविका वंदना ताठे व नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहा येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन चा शुभारंभ संपन्न
प्रभाग विकास हेच ध्येय ठेवून काम करत आहोत माजी महापौर बाबासाहेब वाकळे
नगर प्रतिनिधी प्रभागाचा विकास कसा होईल याकडे स्थानिक नगरसेवक काम करत आहेत.येत्या काळात नगर शहराला पुढील चाळीस वर्षं पुरेल एवढे पाणी मिळणार आहे.तुम्ही आम्हाला निवडून दिले यामुळेच आम्ही हे करू शकलो सातत्याने पाठपुरावा करून मी  निधी आणला त्यामुळे प्रभागाचा विकास हेच ध्येय ठेवून आम्ही काम करत आहोत असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
नगरसेविका वंदना ताठे व नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहा मध्ये  दीप कॉम्प्लेक्स लाईन येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन चा शुभारंभ संपन्न झाला .
यावेळी  नगरसेविका वंदना ताठे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, विलास ताठे,
मनोज ताठे, रत्नमाला लांडे,लक्ष्मी थोरवे, स्मिता भळगट, सिंधू पवार, शीला घुसाळे, महेंद्र चव्हाण, रोहिणी कांबळे,  कालिंदी पवार, नंदा चव्हाण, माधुरी मोटे, पुनम गावडे, सुनिता वाघमारे, मनोज ताठे, ब्रिजेश ताठे, सूर्यभान थोरवे, बबनराव भोसले, राजेंद्र भवार,विजय मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार मनोज ताठे यांनी मानले.यावेळी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक वंदना ताठे ,मनोज ताठे यांचे चांगले काम असल्याने विशेष अभिनंदन केले.