नगर दौंड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू – संदेश कार्ले

अहमदनगर : नगर दौंड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असून त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला होता. परंतु रस्ता दुरुस्तीच्या कामाचे ठेकेदार तसेच गॅस पाईपलाईन च्या कामाचे ठेकेदार मनमानी करत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात बळी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे परिसरात प्रचंड चीड निर्माण झाली होती  आज संदेश कार्लेयांच्या नेतृत्वाखाली आज सर्व परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते

यावेळी संदेश कार्ले  बोलताना म्हणाले नगर दौंड रोड च्या परिस्थितीचे वास्तवता मांडली. येथे रस्ता झाल्यापासून अनेकांचा अपघातात बळी गेला आहे. त्यातच गॅस पाईपलाईनचे काम नियोजन शून्य असल्याने अनेक जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यापुढे सदर कंपनीने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गाड्यांचा वेग जास्त असल्याने धोक्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टर फलक लावण्याची गरज असतानाही ते लावण्यात आले नाहीत. तसेच अपघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली नसल्याने अपघात वाढले आहेत. येथिल परिस्थितीची कल्पना प्रशासनाला दिली होती परंतु काही फरक पडलेला नाही. यापुढे अपघात झाल्यास संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करा तसेच अपघातातील जखमींचा सर्व खर्च संबधित कंपनीकडून वसूल करण्यात यावा. वाहनांचेही झालेले नुकसान कंपनीने द्यावे अशी मागणी कार्ले यांनी केली.