नगर पुणे रस्ता आणि केडगाव बायपास वर ट्राफिक जाम

नेप्ती  कृषी उतपन्न बाजार  समिती मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मोठी अवाक जमा झाल्याने अडीच ते तीन हजार वाहने त्या रस्त्यावर आली आहेत .  त्यामुळे ट्रक चालकांच्या  बेशिस्तीमुळे संपूर्ण बाय पास रास्ता आणि नगर पूना  महामार्ग येथे ट्राफिक जाम झाले आहे . या रस्त्यावर हाताचा बोटावर मोजण्याइतके वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने तब्बल सहा तास वाहतूक ठप्प होती या मुळे  बाजार समितीचा कांदा लिलावाचा  कामकाजावर देखील याचा परिणाम झाला आहे .
कोरोनानंतर नेप्ती उपबाजार समितीत दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. अनेक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असून, नेप्ती कांदा विभागात फक्त विक्रीसाठी एकच सेल हॉल उपलब्ध आहे. या सेल हॉलच्या क्षमतेच्या पाचपट अधिक कांदा बाजारात दाखल होत आहे. नाईलाजाने आलेला कांदा पार्किंग व रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उतरवावा लागत आहे. सोमवार, गुरुवार व शनिवारी लिलावाच्या दिवशी उपबाजार समितीमध्ये एकाचवेळी शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आनलेले वाहन व ग्राहकाने घेतलेला कांदा भरुन बाहेर पडणारे वाहनामुळे दिवसभर वाहतुक कोंडी होत आहे. तासनतास शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना वाहतुक कोंडीत अडकत आहे.
नेप्ती उपबाजार समितीत कांदा लिलावाच्या दिवशी वाहतुक कोंडी नित्याचीच बाब झाली असताना, वाहतुक पोलिसांकडूनया घटनेकडे  दुर्लक्ष होत आहे. सदर ठिकाणी वाहतुक पोलिस नेमण्याची मागणी प्रवाशी व स्थाईक नागरिकांकडून केली जात आहे.