नगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजरने दिले ई मेल द्वारे उत्तर

नगर पुणे रेल्वे सेवा लवकरच सुरू होईल अशा व्यर्थ वल्गना करणार्‍यांना ही चांगलीच चपराक आहे. कारण ही रेल्वे कधीच सुरू होऊ शकणार नाही तसा आमचा विचारही नाही असा स्पष्ट खुलासा सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजर कार्यालयाने केला आहे. जागरूक नागरिक मंचाचे एक शिष्ट मंडळ मंध्यंतरी सेंट्रल रेल्वेच्या व्ही टी  मुंबई येथील कार्यालयात गेले होते. मंचाचे अध्यकाश सुहास भाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने रेल्वेचे सहायक्क अभियंता ग्रीवन्स विभागाचे केळकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्यांना हा विषय सविस्तर समजावून सांगितलं. नगर पुणे रेल्वे शट्ल सेवा सुरू करणे कसे नितांत गरजेचे आहे . याचा अहवाल त्यांनी अधिकार्‍यांना दिला. त्यावर आता रेल्वेने उत्तर दिले आहे.

रेल्वेचे उप अभियंता जॉर्ज इप्पन यांनी हा खुलासा केला आहे. नगर पुणे शट्ल सेवा सुरू होऊच शक्त नाही कारण नगरमध्ये रेल्वे स्थानकात त्यासाठी लागणारे अत्यंत महत्वाचे टर्मिनल इन्फ्रास्ट्रक्चर उपळब्ध्च नाही. आणि नगर हून पुण्याला जाणार्‍या दररोजच्या 6 लांब पाल्याच्या आणि  सप्ताह काळात काळात वेळापत्रकानुसार धावन्यार्‍या 16 रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. असा खुलासा केला आहे पण या गाड्यांनमध्ये नगरकरणा बसता येत नाही कारन त्याच्ये तिकीट नगरकरणा मिळत नाही याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांना माहीत नाही का असा खरा प्रश्न आहे. नगर पुणे रेल्वे लवकर सुरू होणार असल्याबबत स्थानिक पुढारी आणि समिति सदस्य जो ढगात गोळीबार करत तो खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे इथल्या इथे कुठलेही अधिकार नसलेल्या अधिकार्‍यांचा पुढे पुढे करून खेळ खेळवून लोकांना भ्रमात ठेवणारयाणी यातून धडा घ्यावा आणि हे रेल्वे सुरू करण्यासाठी आपल्याला थेट केंद्रीय मंत्र्‍यान कडेच पाठपुरावा करावा लागणार असे मुळे यांनी स्पष्ट केले आहे.