नगर शहर पोलीस उपाधीक्षक पदी अनिल कातकडे .

मागील अडीच महिन्यापासून रिक्त असलेल्या नगर शहर पिलाचे उपाधीक्षक पदी अनिल कातकडे तर आर्थिक गुन्हे शाखेचा उपअधीक्षक पदी  कमलाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे . कातकडे नाशिक ग्रामीण येथे तर जाधव नाशिक शहर येथे कार्यरत होते . राज्य सरकारचा गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा १७५ पोलीस निरीक्षकांच्या उपाधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त यांचा पदोन्नती नंतरचा पदस्थापनाबद्दल आदेश काढले आहेत . 
 
अहमदनगर शहर पोलीस उपाधीक्षक विशाल ठुमे यांची बदली झाल्याने गेल्या अडीच महिन्यापासून शहर पोलीस उपाधीक्षक पद रिक्त होते . नगर ग्रामीणचे उपाधीक्षक अजित पाटील आणि  त्या नंतर श्रीराम पूर चे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचा  कडे शहर पोलीस उपाधीक्षक पदाचा प्रभारी पदभार होता . कातकडे यांचा नियुक्तीने नगर शहराला पूर्ण वेळ पोलीस उपाधीक्षक पद  मिळाले  आहे . तसेच आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपाधीक्षक प्रांजल  सोनवणे यांचा बदलीनंतर हे पद  रिक्त होते त्यांचा जागी जाधव याना नियुक्ती मिळाली आहे .