नवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन
जामखेड – जामखेड बीड रस्त्यावर असलेल्या नवले पेट्रोल पंपावर आजपासून सिएनजी पंपाचा शुभारंभ आ. रोहीत पवार यांच्या हस्ते व आ. सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जामखेड, आष्टी, पाटोदा तालुक्यातून मित्रपरिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, नवले परिवाराने दोन वर्षांपूर्वी पेट्रोल पंप सुरू केला आहे. जसा जसा काळ बदलतो तशा नवीन गोष्टी स्विकाराव्या लागतात. पेट्रोल डिझेल प्रमाणे सिएनजी प्रमाण वाढत आहे. काळाची गरज ओळखून नवले परिवाराने येथे सिएनजी पंप सुरू केला आहे. यासाठी या कंपनीचे मांडगे साहेब यांनी मोठे सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करतो. सिएनजी वापरल्यास एक किलोमीटर मागे दोन ते तीन रूपयांचा फायदा होतो आणी पर्यावरणाचा समतोल राखला जातो. या कार्यक्रमास दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते जरी एकत्र आले तरी त्याची गल्लत न करता राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ते व्यवसायाच्या ठिकाणी आणता कामा नये.
आ. सुरेश आण्णा धस म्हणाले, आपल्या राज्यात मोठय़ा प्रमाणावर खाजगी व सहकारी तत्त्वावर साखर कारखाने आहेत. को जनरेशनमुळे साखर कारखान्याचा फायदा झाला आहे. आता साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉल निर्मितीवर कारखान्यांनी भर द्यावा ते पेट्रोलमध्ये मिसळले जाते त्यामुळे शासनाचा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल. सिएनजी पंप या ५० ते ६० कि. मी. परिसरात नाही. अनेक वाहनांना या सिएनजी पंपाचा फायदा होईल.
नवले पेट्रोलियम कंपनीचे विनोद नवले म्हणाले, २०१९ साली पेट्रोल पंप सुरू केला. आजपासून सिएनजी पंप आ. रोहीत पवार व आ. सुरेश आण्णा धस यांच्या उपस्थितीत सुरू केला आहे. सिएनजी वापरामुळे गाड्यांचे मायलेज वाढते, प्रदुषण कमी होते,पेट्रोल डिझेल पेक्षा स्वस्त आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात एकच दर ठरलेला आहे. आष्टी, पाटोदा, भुम, करमाळा, पाथर्डी या परिसरातील हा पहिला पंप असून ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करू
सिएनजी पंपाचा उद्घाटन झाल्यानंतर वाहनांची सिएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी जयदत्त धस,
नवले पेट्रोलियमचे संचालक संजय नवले, ओंकार नवले, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे,राजेंद्र पवार, रमेश गुगळे, संजय वराट, माऊली जरांगे,प्रदीप शेटे, भारत पेट्रोलियम कंपनीचे मांडगे साहेब व त्यांचे सर्व सहकारी, नगरसेवक आमित चिंतामनी, पवनराजे, विकास राळेभात, राळेभात, अॅड. प्रवीण सानप, लक्ष्मण ढेपे, हरिभाऊ आजबे, राजेंद्र गोरे, हर्षल डोके,हनुमंत पाटील, विजय कोठारी, आष्टी, कर्जत जामखेड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.