नाताळ निमित्त कोठी परिसराची स्वच्छता करण्याची मागणी – सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे.

परिसरात घाणीचे साम्राज्य साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

कोठी स्टेशन रोड भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ओमायक्रोन सारख्या नवीन आजार पसरत असून तसेच सध्या नाताळ ख्रिसमस सणानिमित्त कोठी परिसरात ठिकाणी औषध फवारणी व गवत वाढल्यामुळे गवताची कटिंग करून संपूर्ण परिसरामध्ये साफ-सफाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांना विविध मागणीचे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे समवेत रोहित निकाळजे, तेजस जाधव, सुमित घोरपडे, पृथ्वीराज कर्डिले, पियुष साठे, अनिकेत कांबळे, तुषार देठे, रोहन लिंबू, हरिष भोसले, यश गायकवाड, सुजल थोरात, राहुल ढगे, गौरव साळवे, तुषार थोरात, सुमित नेटके आदीसह कोठी भागातील नागरिक उपस्थित होते.

कोठी स्टेशन रोड भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचप्रमाणे याठिकाणी गवताची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच  ओमायक्रोन यासारख्या नवीन आजार पसरत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्यास येथे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व लोकांच्या आरोग्य मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो तसेच नाताळ या सणानिमित्त याठिकाणी नाताळ सण हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून त्यामुळे महानगरपालिकेचे साफसफाईचे कर्मचारी येथे लावून या ठिकाणी घाण साफ करून गवताची कटिंग करून या ठिकाणी औषध फवारणी करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.