प्रतिबिंब सामाजिक संस्थेचा २१ वा वधू-वर पालक परिचय मेळावा व समाज भूषण पुरस्कार सोहळा संपन्न.

प्रतिबिंब सामाजिक संस्थेचा २१ वा वधू-वर पालक परिचय मेळावा व समाज भूषण पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सौ.कल्पनाताई शरद काळोखे तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर शहराच्या महापौर सौ.रोहिणीताई संजय शेंडगे व माजी केंद्रप्रमुख उत्तमराव शेलार उपस्थित होते.

मेळाव्यास शेकडो वधू-वरांनी आपले परिचय पत्रक भरून देऊन स्वतः स्टेजवर जाऊन आपला परिचय करून दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाची सूचना संस्था अध्यक्ष दादू नेटके यांनी मांडली तर समाजाच्या वतीने अनुमोदन ॲड. मिलिंद घोरपडे यांनी दिली समाजाच्या आणि संस्थेच्या वतीने जमलेल्या प्रमुख पाहुणे आणि सकल मातंग समाजाचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला यामध्ये मुख्यत्वे महापौर रोहिणीताई शेंडगे, उत्तमराव शेलार, कार्यक्रम अध्यक्ष कल्पनाताई काळोखे, विजय वडागळे, विनोदभाऊ वैरागर, गुलाबराव गाडे, विजय उमाप, मा.सुनील सकट, अशोकराव भोसले, अरुण सकट, मेजर राजू शिंदे, जालिंदर वाल्हेकर, राजू भिसे, सुनील पारधे,  तुळशीराम जगधने, सुनील जगताप, रमेश जगताप, अरुण डाके, अजय रणसिंग, राजू भिसे, सुरेश मिसाळ आदिंचा सत्कार करण्यात आला. समाज भूषण पुरस्काराचे  यामध्ये माजी नगरसेवक अनिल गणपतराव शेकटकर यांचा क्रातीवीर लहुजी साळवे यांचे स्मृतिचिन्ह हरिभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मानपत्र व समाजाच्या वतीने ११ हजार रुपयांचे मानधन देऊन त्यांना समाजाच्या वतीने गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी अहमदनगर शहरासह तालुक्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या उपस्थितीच्या आकर्षण संचालक संगमनेर सहकारी साखर कारखाना जगन्नाथ आव्हाड, साहेबराव पाचारणे पाटील, नामदेव राऊत, बाळासाहेब मोरे, दिनकरराव सकट, चंद्रकांतजी काळोखे, राजू रोकडे, रामदास ठोकळ, रामदास वाघमारे, कांबळे सर, विलास बोरुडे, अर्जुनराव बोरुडे, अक्षय जगताप, आदित्य जगताप, शुभम उमाप, लक्ष्मीकांत भालेराव, सुधाकर शेरकर, विनोद सोनवणे आदी सह  कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब शेलार व सुनील जगधने यांनी केले तर संपूर्ण स्टेट ची सजावट संदीप पारधे गणेश छिंदम यांनी केली होती. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.