निमगाव वाघाची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार

नगर तालुक्यातील निमगाव वाघाची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सरपंच रुपाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत घरकुल वंचितांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ड  यादी बाबत चर्चा होऊन सदर यादी सादर करण्यात आली. तर ग्रामपंचायत सदस्य तथा संत गाडगेबाबा ग्राम समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा अभिनंदनाचा ठराव घेऊन शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर शाखेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, अरुण कापसे, अनिल डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक गायकवाड, प्रमोद जाधव, संजय कापसे, किरण जाधव, रावसाहेब केदार, मयुर काळे, बाबा म्हसे, पिंटू जाधव, अजय ठाणगे, ज्ञानदेव कापसे, मच्छिंद्र काळे, कामगार तलाठी प्रमोद गायकवाड, दीपक जाधव, संगिता आतकर, पोपट कदम, संभा पाचारणे, इरफान शेख, शब्बीर शेख, जलील शेख, इलाही शेख, जमीर शेख, कैलास मोरे, साहिल शेख, दत्तू मोरे आदी उपस्थित होते. पै. नाना डोंगरे यांनी सत्काराला उत्तर देताना मिळालेला पुरस्कार हा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळाला आहे. गावात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, विकासात्मक बदल घडविण्यासाठी कटिबध्द आहे. गावाच्या विकासात युवकांनी पुढाकार घेऊन योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.