न्यू आर्टस् महाविद्यालयात तलवारबाजी स्पर्धा संपन्न

सा. फु.पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयालयीन तलवारबाजी  मुले/ मुली या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.अहमदनगर जिल्ह्यातून 60 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता . एकूण 15 महाविद्यालय या स्पर्धेत सहभागी झाले होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बी एच झावरे सर उपस्थित होते.त्यानी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळात भाग घेतला पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सह सचिव कुटे सर उपस्थित  होते. तसेच  महाविद्यालयाचे प्रबंधक बबन साबळे,  प्रा सुनिल जाधव,प्रा सुभाष देशमुख,प्रा संजय धोपवकर,प्रा अजित कदम,प्रा डॉ रवींद्र खंदारे प्रा डॉ संतोष भुजबळ,प्रा सुधाकर सुंभे हे  उपस्थित  होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अर्चना रोहकले यांनी केले,प्रास्ताविक प्रा डॉ शरद मगर यांनी केले तर आभार प्रा धान्यकुमार हराळ यांनी केले. स्पर्धा यशस्व्ही होण्यासाठी प्रा धनंजय लाटे प्रा आकाश नढे तुषार चौरे अप्पा दाते यांनी परिश्रम घेतले.