न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा .

पोवाडा आणि शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन .

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज च्या  न्यू आर्ट्स   कॉमर्स अँड सायन्स  कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला .

कार्यक्रमामध्ये प्रथम छत्रपतींच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले . त्यानंतर शिवाजी महाराजांच्या  मूर्तीचे पूजन करण्यात आले . यावेळी आरती , पोवाडा असे कार्यक्रम  तसेच शिवचरित्र व्याख्यान   यांचं आयोजन केले होते . कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष असून   दरवर्षी विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते  अशी माहिती  न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स  कॉलेजचे प्राचार्य झावरे सर यांनी दिली .  या शिवजयंती  सोहळ्याच्या  नियोजनचि जबाबदारी  संदेश शिंदे आणि हर्षवर्धन काकडे यांनी पार पाडली . या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच   या कार्यक्रमास   प्राचार्य  झावरे सर , उपप्राचार्य आठरे सर , सागडे सर ,  कळमकर  सर  आदि उपस्थित होते .