पत्रकारांनी जांभेकरांच्या लेखणीचा वसा पुढे चालू ठेवावा – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

बाळशास्त्री जांभेकर यांना वयाच्या विसाव्या वर्षी खुप मोठी जाण होती समाजाची सेवा करण्यासाठी समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत सुरू केले. मराठी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळण्यासाठी तर भारतातील अनिष्ट चालीरीती इंग्रजांना कळण्यासाठी दोन्ही भाषेत लिखाण केले. आजही बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य खुपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पत्रकारांनी जांभेकरांच्या लेखणीचा वसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त आज सायंकाळी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी गायकवाड बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, वसंत सानप, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, प्रकाश खंडागळे, यासीन शेख, अविनाश बोधले, ओंकार दळवी, विजय अवसरे, दत्ता राऊत, संजय वारभोग, लियाकत शेख, धनराज पवार, विजय अवसरे, शिवाजी इकडे, किरण रेडे, फायकभाई शेख, सचिन अटकरे, संतोष गर्जे, संजय लहाने, जाकीर शेख यांच्या सह सर्वच पत्रकार उपस्थित होते

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, जामखेड पोलीसांनी वर्षभरात जे चांगले काम केले आहे त्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. आमचे काम समाजापर्यंत नेण्यासाठी पत्रकार नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे एक वर्षाचा कालखंड खुपच झटपट निघून गेला.पोलीस व पत्रकार यांच्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी पोलीस व पत्रकारांनी एकत्र बसून विचारविनिमय करणे आवश्यक आहे. यातून विचाराची देवाणघेवाण होण्यास मदत होते. जामखेड मधील सर्वच पत्रकार खुपच सकारात्मक आहेत असेही गायकवाड यांनी सांगितले.पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण व दिपक देवमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लियाकत शेख यांनी केले