पत्रकार दिनानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती  निमित्त शहर शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . यावेळी  दैनिक समाचार चे प्रमुख महेंद्र कुलकर्णी तसेच  पत्रकार  बाबा जाधव , मिलिंद देखने, अमीर सय्यद, श्रीराम जोशी ,अरुण वाघमोडे, मयूर मेहता ,सुदाम देशमुख, राजू खरपुडे, रामभाऊ नळकांडे ,प्रसाद शिंदे हे पत्रकार या वेळी  उपस्थित होते.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या . ते म्हणाले पत्रकारांशी चर्चा करताना नगर शहरातील  नागरिकांचे प्रश्न आपल्या ला कळतात . पत्रकार हे आपल्याला  वेळोवेळी नगर राजकारणातील आरसा दाखवतात , त्यातून चांगल्या पद्धतीने त्यांचा समाजाला कसा फायदा होईल  याचा प्रयत्न केला जातो . पत्रकार आमच्यावर कधी टीका करत नसून त्या सर्व समावेशक नगर करांचा हितासाठी जे जे लिहितात त्यात सुधारणा करून  पुढं जायचं असतं ,आणि हे नगर पत्रकारांचा लेखणीतून सातत्याने आपल्याला पाहायला  ,वाचायला मिळत म्हणून नगर करांची उद्याची दिशा कशी असावी त्यातील काही त्रुटी असल्यास त्या कश्या कमी कराव्यात तसेच नवीन काही विषय मिळाल्यांनतर त्यातून प्रेरणा मिळते.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी गटनेते संजय शेंडगे, शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम , नगर सेवक दत्ता कावरे आदी मान्यवर उपस्थित होते.