पाचशे झाडाऐवजी एका झाडाची नुकसान भरपाई: शेतकऱ्याचा भूसमाधी घेण्याचा निर्णय

नगर सोलापूर महामार्गावरील मौजे जळगाव येथील बायपास मध्ये गेलेल्या 12 गुंठे शेत जमिनी तील साडेपाचशे झाडां ऐवजी अवघ्या एका झाडाचे पैसे देऊन प्रशासनाने शेतकऱ्याची चेष्टा केली असून याविरुद्ध आवाज उठवूनही उपयोग होत नसल्याने हतबल होत शिवाजी शेटे या शेतकऱ्याने भूसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
         कर्जत तालुक्यातून नगर करमाळा हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या मार्गाच्या रुंदीकरनासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्याची जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे या प्रक्रियेत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या चर्चा झडत असून यातील तत्कालीन प्रांंताधिकारी यांंच्यावर  जाहीरपणे टक्केवारी घेतल्याचे आरोप झाले आहेत, त्यामुळे शेतकर्याच्या प्रश्नाकडे गामभिर्या पाहणे आवश्यक असताना अद्याप ही अधिकारी शेतकऱ्याच म्हणणे ऐकून घेत नाही तर मोजणी पाहणी रेकॉर्ड तयार करण्यात करणे याची जबाबदारी ज्याचे वर आहे असे कर्मचारी व अधिकारी आपले काम योग्य आहे पद्धतीने करत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
            माहिजळगाव येथील शिवाजी अजिनाथ शेटे यांची अवघे 12 गुंठे नावावर असलेली जमीन रस्ता बायपासने होणार असल्याने या वळणावर पूर्णत: अधिग्रहनात
गेला, शेटे यांनी 30 शेळ्यांचे शेळी पालन केले होते त्या शेळ्यांसाठी आपल्या नावावर असलेल्या 12 गुंठे जागेत सुबाभुळीच्या पाचशे झाडांची लागवड केली होती, सदर लागवडी ची नोंद शासकीय कागदपत्रात पूर्वीच केलेली होती, याशिवाय रस्त्याच्या नकाशात या झाडाचा नेमका उल्लेख दिसत असताना या शेतकऱ्याला अवघ्या एका झाडाचे पैसे नुकसान भरपाई म्हणून मिळाले असून या बाबत शेटे यांनी तलाठ्या पासून प्रांताधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयात पत्रव्यवहार करून चकरा मारून ही उपयोग होत नसल्याने व डोक्यावर पाणी वाहून जगवलेली झाडा ची नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेरीस शिवाजी शेटे यांनी आपल्या शेतातच भुसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला असून यामुळे खळबळ माजली आहे. 
            खा. सुजय विखे, आ. रोहित पवार व माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी या प्रश्नावर अनेकदा वक्तव्य केली तर लोक प्रतिनिधीनी अधिकाऱ्या च्या बैठका ही घेतल्या मात्र तरीही शासकीय कागदपत्रात दिसत असलेल्या झाडा ची नुकसान भरपाई मिळत नसेल तर शासकीय यंत्रणा कोणासाठी व कशी काम करते आहे असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात भूसंपादन होणारा जमिनीची पाहणी करून नोंद करण्या ची जबाबदारी असणाऱ्या व या प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकार्याची चौकशी करून मला न्याय द्यावा अन्यथा भूमीहीन होऊन जगायचे कसे असा प्रश्न शेटे यांनी उपस्थित केला आहे.