पुतळे बसवण्यात विलंब झाल्याने नाराजी

अहमदनगर : नगर शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसविण्यासंदर्भात महापालिकेत ठराव झाला . समिती गठीत झाली . याबाबत वारंवार पाठपुरावाही केला , तरीही प्रशासन हा विषय गांभीर्याने घेत नाही . येत्या महिनाभरात महापुरुषांचे नियोजित ठिकाणी पुतळे बसविले नाही , तर या कामासाठी आम्हीच पुढाकार घेणार , असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिला . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले व डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे बसविण्यास विलंब होत असल्याने वाकळे यांनी नाराजी व्यक्त करत या कामाला विलंब का झाला , याबाबत जबाबदारी निश्चित करा , अशीही मागणी वाकळे यांनी केली .