प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांचा सन्मान.

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे च्या वतीने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांचा दिव्यांग सप्ताह निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल श्रीफळ व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जीवन चरित्र याचे पुस्तक भेट देऊन सन्मान करताना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अँड. लक्ष्मण पोकळे, नगर शहर उपाध्यक्ष संदेश रपारिया, संदीप खामकर श्रीगोंदा अहमदनगर जिल्हा संघटक राजेंद्र पोकळे आदी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत असलेले दिव्यांग महिला आजारा निमित्त गैरहजर होत्या त्या संदर्भात त्यांना हजर करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने जिल्हाध्यक्ष पोकळे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिव्यांग महिले संदर्भात सांगून दिव्यांग महिलेस तत्काळ न्याय देण्यात आला त्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.