प्रि वेडिंग, पोस्ट वेडिंग, फोटो शुटसाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या जन्मभूमीत
जामखेड – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मभूमीत शिल्पसृष्टी व बगीचामधील विविध पुरातन काळातील मुर्ती तसेच देखावे व तेथून जवळून वाहणारी सिना नदीवर असलेल्या बंधा-याचे खोलीकरण व रूंदीकरणामुळे झाल्याने पाणीसाठ्यात झालेली वाढ यामुळे चोंडीच्या सौंदर्यात भर पडली असल्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. यामुळे याठिकाणी प्रि वेडींग, पोस्ट वेडींग, फॅमिली फोटोशुट, कपल फोटो व सेल्फी पॉंईट यासाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या भुमित येत असल्याने रोजगाराचे साधने वाढत आहे.