प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले : अण्णा हजारे

अनाथांचा माई असलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा निधनाने जिल्ह्यात विविध आठवणी जाग्या झाल्या . ठीक ठिकाणी शोक सभा झाल्या  अनेकांनी आठवणींना उजळा देत आदरांजली वाहिली .
आजचा काळात माणसे मी आणि माझ्या पलीकडे पाहायला तयार नाहीत .अशा परिस्थिती मध्ये सिंधुताईनी अनाथांची माय  होऊन जे काम केले ते अतिशय महत्वाचे आहे . आई चा  ममतेने हजारो अनाथांचा सांभाळ कळणारी ती एक आधार होती .  त्यांचा अचानक जाण्याने समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे , अशा शब्दात जेष्ठ समाज सेवक आणा हजारे  यांनी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा निधनाबद्दल भावना व्यक्त केली .