फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

अहमदनगर — हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपशब्द वापरणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत निषेध करण्यात आला.

यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजीम राजे, फिरोज पठाण, जहीर सय्यद, शहबाज शेख, राजेंद्र गायकवाड, मूबीन सय्यद, शफी खान, जावेद सय्यद, हुसेन शेख, स्वप्नाली चांदेकर, अनुराधा चांदेकर, सायली चांदेकर, मदीना पठाण, रेश्मा शेख, संगीता कोरहळे, मुमताज शेख, राजेंद्र झेंडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई येथील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगण म्हैसूरचा राजा टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. मालाड चे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री असलम शेख यांनी त्यांच्या निधीतून खेळाडूंसाठी हे मैदान बांधले आहे. या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. मात्र भाजपने मैदानाच्या नावाला विरोध केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान हा हिंदूवर अनन्वीत्त करणारा राजा होता व टिपू सुलतान देश गौरव होऊ शकत नाही असे वादग्रस्त विधान केले. वादग्रस्त विधान करणारे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Attachments area