जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील लोहगाव येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याचा भंग करीत एका अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि लोहगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह प्रकरणी घोडेगाव (ता.नेवासे )येथील ग्रामसेवक अर्जुन गागडे यांचा फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचे वडील अप्पासाहेब ढोरे ,आई संपदा ढेरे , सासरा अशोक शिंदे , सासू झुंबर बाई शिंदे, नवरा रामनाथ शिंदे , व पुरोहित या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अल्पवयीन मुलीचा गावातील एका युवकासोबत ३ जुलै २०२१ रोजी घोडेगाव येथील एका मंगल कार्यालय मध्ये विवाह सोहळा लावण्यात आला होता. हि बाब नगर चा बालकल्याण समिती व चाईल्ड लाइन सेवा भावी संस्थेस समजली . शनिवारी (ता.२७) रोजी सायंकाळी प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली , तक्रारीत तथ्य आढळले . रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . अधिक तपास हवालदार एम आर अडकित्ते करीत आहेत .