बाल विवाह न करण्याची झोपडपट्टीतील ६०० मुलांनी घेतली शपथ

अहमदनगर — आम्हाला शिकायचंय शिकून मोठं व्हायचंय आमच्या शिक्षणात नातेवाईकांनी बाधा आणली आणि आमचं लग्न ठरवलं तर आम्ही थेट चाइल्ड लाईन चा १०९८ या क्रमांकावर संपर्क करूआणि तक्रार करू असे सांगत नगर शहरात झोपडपट्टीतील राहणाऱ्या ६०० मुलींनी बालविवाह न करण्याची शपथ घेतली .
वाढते बालविवाह रोखण्यासाठी चाइल्ड लाइन ,उडान आणि स्नेहालय संस्था संचालित बालभवन यांचा संयुक्त विद्धयामाने बालविवाह बाबत जनजागृती उपक्रम सुरु आहे , शनिवारी शहरातील या संस्थांचा  प्रतिनिधीनि   सिद्धार्थनगर ,संजय नगर , रामवाडी ,भिंगार ,मुकुंदनगर , आदी परिसरातील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलींशी संवाद साधून त्यांनी जनजागृती करत त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले , यावेळी मुलींसह त्यांचा पालकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला . कोरोना काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाल  विवाह वाढले होते , विशेष म्हणजे गरीब कुटुंबातील मुलींचे बालविवाह होण्याचा प्रमाण मोठा आहे . कोरोना काळात चाइल्ड लाइन ,उडान  आणि  बालविवाह प्रतिबंधक अभियानाचा माध्यमातून , २३५ बालविवाह रोखले गेले आणि १६ प्रकरणात बालविवाह प्रतिमाबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले .  या उपक्रमासाठी गिरीश कुलकर्णी ,बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख यांचा मार्गदर्शनाखाली चाइल्ड लाइन चे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी ,समुपदेशक अलीम पठाण ,सदस्य  शाहिद शेख , अब्दुल खान , प्रवीण कदम ,पूजा पोपळघट , राहुल कांबळे ,प्रियांका गायकवाड ,स्वयंसेवक राहुल वैराळ हे परिश्रम घेत आहेत .