बाळासाहेब थोरात यांचे हस्ते पद्मश्री पोपटराव पवार यांना जीवन गौरव पुरस्कार

पद्मश्री पोपटराव पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यातील  माणूस शोधून समाजामध्ये केलेले काम हे त्यांना पद्मश्री पर्यंत घेऊन गेले असे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगर व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण व्यासपीठातर्फे पद्मश्री पोपटराव पवार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांचा सन्मान नामदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की यशवंतराव चव्हाण हे मागच्या पिढीलाच नव्हे तर याही पिढीला प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तरुण पिढीने यशवंतराव चव्हाण समजून घेतले पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांचे विचार वाचले पाहिजे तरच त्यांना समाजामध्ये काहीतरी करता येईल. समाजाचे परिवर्तन करायचे असेल तर झोकुन घ्यावे लागते आणि समाजासाठी काम करावे लागते त्यामध्ये अनंत अडचणी आल्या तरी जो माणूस त्या अडचणी समजून घेऊन त्या माणसाला समजून घेऊन समाजामध्ये क्रांती करतो तो माणूस हा समाजाच्या कायम लक्षात राहतो पोपटराव पवार यांच्या कार्याचे मला नेहमीच कौतुक राहिले आहे त्यांनी केलेल्या कार्याची पद्मश्री देऊन योग्य दखल घेतली गेली याचा आम्हा नगरकरांना मोठा अभिमान आहे.
 आज माझ्या आयुष्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे ते जर वजा केले तर मी शून्य होतो त्यांचे विचार मला प्रेरणा देऊन जातात त्यांनी केलेले कार्य व राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या लक्षात राहण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या लक्षात व तरुणांच्या लक्षात राहणे व त्या पद्धतीने काम करणे ही काळाची गरज आहे यातूनच महाराष्ट्र पुढे जाईल असे ते म्हणाले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक हे शिक्षण संस्था एक व्यापक चळवळ झाली असून यातून शिक्षण घेऊन अनेक मुले आज वेगवेगळ्या पदावर ती कार्यरत आहे. या संस्थेचा मला नेहमीच अभिमान वाटतो यावेळी सत्काराला उत्तर देताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या क्रीडांगणात मी क्रिकेट खेळलो आहे ग्रामीण भागातील असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांची  जाण व ग्रामीण भागासाठी काय केले पाहिजे यासाठी मी केलेली धडपड आणि त्याला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद म्हणून मला हा प्रेरणादायी पुरस्कार मिळाला आहे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे असे मी समजतो
 प्रारंभी स्वागत व पाहुण्यांचा परिचय यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे अध्यक्ष डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी केले. तर प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी डी खानदेशे यांनी केले. यावेळी बोलताना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे म्हणाले की यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा घेऊन आम्ही बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहोत आज ही संस्था जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आदर्शवत आहे यामागे अनेक महान पुरुषांची प्रेरणा आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले तर आभार यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ आभार  मानले
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव मोरे, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सचिव जी. डी. खान्देशी , आमदार लहू कानडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, प्राचार्य भास्करराव झावरे,डॉ धनंजय वाघ आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे संस्थापक स्वर्गीय रामनाथ जी वाघ यांना नामदार थोरात यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले