बेलापूरात स्फोट ,घराचे छत उडाले .

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील गाढे गल्लीतील शशिकांत शेलार यांचा राहत्या घरात गुरुवारी सकाळी सातच सुमारास स्फोट होऊन पती पत्नी व दोन मुले . गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . दरम्यान हा गॅस टाकीचा स्फोट झाल्याची माहिती जखमींनी दिली असून पोलिसांनी या घटनेचा दुजोरा दिला नाही .
शशिकांत शेलार यांचा राहत्या घरी गुरुवारी सकाळी सातचा  सुमारास मोठा स्फोट झाला .  हा स्फोट इतका भयानक होता कि घराचा छतावरील पत्रे वरवंडी तोडून लांब जाऊन पडले तर काही प्रमाणात बांधकाम हि पडले . या स्फोटात शशिकांत शेलार  त्यांची पत्नी ज्योती , मुलगा यश , मुलगी नमोश्री , हे गंभीर भाजले . समोर राहणारे वडील सेवानिवृत्त शिक्षक अशोक शेलार व शेजारील लोकांनी धाव घेतली , त्यांनी जखमींना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठवले . तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या या सर्वाना पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालय लोणी येथे पाठवले . गॅस चा स्फोट झाल्याने जखमींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले .
दरम्यान बेलापूर पोलीस ठाण्याचे अतुल लोटके , रामेश्वर  ढोकणे , निखिल तमणर , पोपट भोईटे , हरीश पानसंबळ , यांनी घटना स्थळी भेट दिली , अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे ,उपाधीक्षक संदीप मिटके , पोलीस निरीक्षक संजय सानप , आदींनीही घटना स्थळी पाहणी केली . हा स्फोट कशाचा आहे याचा शोध घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक व फॉरेन्सिक व बॉम्ब शोधक पथकालाही  पाचारण केले आहे .