बे-खौफ झालेल्या कुप्रसिद्ध आकाश डाके टोळीवर मकोकान्वये दोषारोपपत्र दाखल

संपूर्ण नगर  जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करण्यास  कुप्रसिद्ध असलेल्या आकाश डाके व  टोळी विरुद्ध तोफखाना पो.स्टे.  493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकाश डाके टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.
नगर  शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला.त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून  गणेश कु-हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके,बाळासाहेब वाघमारे आणि दोन विधि संघर्शित बालक यांचे विरुद्ध   खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) आकाश भाऊसाहेब डाके (टोळी प्रमुख)
1)तोफखाना पो.स्टे.493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
2)तोफखाना पो.स्टे.316/20 IPC 392,34  प्रमाणे
3)तोफखाना पो.स्टे.329/20 IPC 392,34  प्रमाणे
4)तोफखाना पो.स्टे.919/19 IPC 394, 323,504,34 प्रमाणे
5)तोफखाना पो.स्टे.169/17 IPC 354, 323,504,506,
प्रमाणे
6)कोतवाली पो.स्टे.561/20 IPC 392,34 प्रमाणे
7)कोतवाली पो.स्टे.180/16  मुं. पो.का.क 122 प्रमाणे
8)कोतवाली पो.स्टे.335/14 IPC 394, प्रमाणे
9)कोतवाली पो.स्टे.223/13 IPC 283 प्रमाणे
10) एमआयडीसी पो. स्टे.484/20 IPC 324,323,504,506 प्रमाणे
11)एमआयडीसी पो. स्टे.474/18 IPC 379,34 प्रमाणे
12)एमआयडीसी पो. स्टे.232/17 IPC 324,323,504,506 प्रमाणे
2)  *गणेश भगवान कु-हाडे*
1)तोफखाना पो.स्टे.493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
2)तोफखाना पो.स्टे.316/20 IPC 392,34  प्रमाणे
3)तोफखाना पो.स्टे.329/20 IPC 392,34  प्रमाणे
4)कोतवाली पो.स्टे.561/20 IPC 392,34 प्रमाणे
5)तोफखाना पो.स्टे.7616/20 IPC 393,34  प्रमाणे
6)तोफखाना पो.स्टे.7613/20 IPC 392,34  प्रमाणे
7)तोफखाना पो.स्टे.08/20 IPC 341,324,323,504,506,,34  प्रमाणे
8)एमआयडीसी पो. स्टे.469/18 IPC 394,34 प्रमाणे
9)एमआयडीसी पो. स्टे.46/19 IPC 353,332,224 प्रमाणे
10)तोफखाना पो.स्टे.286/18 IPC 380  प्रमाणे
11)कोतवाली पो.स्टे.506/18 IPC 379 प्रमाणे
12)एमआयडीसी पो. स्टे.182/17 IPC 307,143,147,149,233,504,506 प्रमाणे

सदर टोळी विरुद्ध  मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे करिता  विशेष पोलीस  महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावास   विशेष पोलीस  महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास श्रीरामपूरचे Dy.s.p.संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात   आकाश  डाके टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ii) ,3(2), व 3(4) मोक्का अन्वये अपर पोलीस महासंचालक  (का व सू) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली.  गुन्ह्याचा तपास बी. जी. शेखर पाटील ( विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र), मनोज पाटील ( पोलीस अधीक्षक अहमदनगर) , सौरभ अग्रवाल ( अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके Dysp श्रीरामपुर यांनी करून विशेष मोकका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास कामात त्यांना PI गडकरी, psi समाधान सोळांखे, ASI राजू भालसिंग, PN किरण बनसोड यांनी सहकार्य केले.