भाजयुमो चा जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी त संपन्न ,जिल्हा अध्यक्ष श्रीराज डेरे यांची संकल्पना

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्थान, मुंबई येथे जिल्हाध्यक्ष अँड. श्रीराज डेरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.
            भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय यांनी भाजपा हा देश प्रथम मानणारा पक्ष असून देशासाठी जनसंघाचे विलनीकरण जनता पार्टी त केले. हा इतिहास असून वर्तमानात पण कृषी विधेयक मागे घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी यांच्या साठी केले होते देशासाठी मागे घेतो. हे सांगणारे भाजपा आहे. पूर्वी आजचा युवा मोर्चा उद्याचा भाजपा आहे आता आजचा युवा मोर्चा आजचाच भाजपा आहे. व्यक्तिपूजक न होता पक्ष निष्ठ होण्याचा सल्ला त्यांनी दिला.
      भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील देशासाठी पार्टी अन पार्टी साठी कार्यकर्ता हे फक्त भाजपा मध्ये आहे. इतर पक्ष हे पैशातून सत्ता अन सत्तेतून पैसा असे सूत्र असणारे आहेत. कार्यकर्त्यांची दिशा अन दशा बदलविण्याची ताकद प्रशिक्षण वर्गातून होते. भाजपा माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी भाजप एकमेव पक्ष हा कार्यकर्त्यांचा असून इतर पार्टी कोणाच्या तरी खाजगी मालकीच्या आहेत. बैठका, प्रशिक्षण वर्ग हा आपला ढाचा आहे.
         यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, उत्तर नगर जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.सोनाली नाईकवाडी, सोशल मिडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, सांस्कृतिक सेल चे जिल्हा संयोजक बंडूकुमार शिंदे, ऋषीराज खर्डे आदी उपस्थित होते
          या प्रशिक्षण शिबिरात आमदार अतुलजी भातखळकर यांनी जनसंघ ते भाजपा चा इतिहास, उद्योग आघाडी चे प्रदेश संयोजक प्रदिपजी पेशकार यांनी युवकांमध्ये उदमशीलता वाढविण्यासाठी उद्योग उभारणे, कर्ज अन सबसिडी या बाबद मार्गदर्शन केले. प्रबोधिनी चे देवेंद्र पै यांनी व्यक्तिमत्त्व विकास तर मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे यांनी राजकीय जीवनातील आंदोलनाचे महत्व विषद केले. यावेळी आंदोलने कशी करावी, भाषणे कोणत्या आवेशात करावी याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून घेतले. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ओ.एस.डी. निधीजी कामदार यांनी प्रचार प्रसिद्धी चे तंत्र व सोशल मिडिया तर प्रदेश प्यानेलिस्ट गणेश खणकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आपला विचार परिवार या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी पंडित दीनदयाळ दर्शन प्रकल्प याला भेट दिली.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस योगीराज परदेशी, सुनील उगले, विशाल यादव, नरेश सुराणा, जिल्हा कोषाध्यक्ष केशव दवांगे, विकास गुळवे, सोशल मिडिया सेलचे जिल्हा सहसंयोजक सोमनाथ बोरसे आदींनी प्रयत्न केले.