भारतीय जनता पार्टी अहमदनगर महिला आघाडी मोर्चाच्या वतीने ई श्रम योजना कार्ड नोंदणी अभियान

नगर –  असंघटीत कामगारांसाठी केंद्र शासित ई श्रम योजने अंतर्गत भारतीय जनता  पार्टी अहमदनगर महिला आघाडी मोर्चाच्या वतीने ई श्रम योजना कार्ड नोंदणी अभियान दि. १७ , १८ , १९ फेबुवारी  राबविण्यात येणारा आहे.अशी माहिती भाजपा महिला मोर्चा कार्यकारणी सदस्या  संयोजिका सौ.गीता गिल्डा  यांनी दिली.

या कार्ड नोंदणी साठी शेतमजूर,शेतकरी,सुतार,कुंभार,नाव्ही,टेलर,ड्रायव्हर,मॅकेनिक ,फेरीवाले,रिक्षाचालक,सफाई कामगार,बांधकाम व  घरेलू कामगार,लोहार,पेंटर, फोटोग्राफर  व सर्व प्रकारचे छोटे काम करणारे कामगार पात्र असून याचा त्यांनी लाभ घेणे आवश्यक आहे.या कार्ड नोंदणी करणार्यांना एक वर्ष मोफत विमा,घर बांधणी तसेच रोजगार साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत त्याच बरोबर मुलींचे लग्न,मातृत्व व उपचारासाठी आर्थिक लाभ मिळू शकतो,तसेच हे श्रम कार्ड विविध शासकीय योजनासाठी फायदेशीर ठरणार आहे.

या श्रम कार्ड योजना नोंदणी साठी आधारकार्ड, बँक पासबुक झेरोक्स, वय १६ ते ५९आयकर न भरणारे व  मोबाईल क्रमांक  असणे आवश्यक आहे.

सर्कल गेस्ट हाऊस , सर्कल आँटो ,बंगाल चौकी येथे १७ तारखेला या नोंदणी अभियानाचा शुभारंभ संध्याकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.दि.१७.१८ व १९ रोजी संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत नोंदणी सेवा उपलब्ध असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ.उमाताई खापरे प्रदेश सचिव  सुरेखा विद्ये,  भाजपा जिल्हाध्यक्ष  भैया गंधे ,अहमदनगर शहर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.अंजली वल्लाकट्टी,वंदना पंडीत ,देवराईकर यांच्या सहकार्याने या उपक्रमासाठी शुभांगी साठे,जानवे प्रिया,गीतांजली काळे,मालन ढोणे,ज्योस्ना मुंगी,सविता कोटा,प्रिया देपोलकर व सर्व महिला कार्यकर्त्या कार्यरत आहेत.