भिंगार आलमगीर येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठण

नगर दि. १९  — भिंगार आलमगीर येथील दत्त मंदिरामध्ये शहर शिवसेना व नगर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने काल रात्री हनुमान चालीसा पाठ पठण कार्यक्रम करण्यात आला . यावेळी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम ,माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक दीपक खैरे, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे ,नगरसेवक भैय्या परदेशी ,काका शेळके, संतोष ज्ञान अप्पा व सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते