मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोना

राज्यातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात दोन मंत्री, 53 अधिकारी व काही आमदार कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती काल, बुधवारी नगरमध्ये बोलताना दिली होती.  कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मंत्र्यामध्ये  राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे.

तनपुरे यांनी कोरोना झाल्याची माहिती स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. तनपुरे यांनी म्हटले आहे की, ‘आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत, अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाही तनपुरे यांना कोरोना झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाने गाठले आहे.