महाधन क्रॉपटेकच्या साह्याने कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात अधिक वाढ .

अहमदनगर (प्रतिनिधी)- कांदा हे सर्वात महत्त्वाचे नगदी पीक असल्याने, त्याच्या उत्पादनखर्चात झालेली वाढ, स्थिर किंवा कमी होणारे उत्पादन ह्या भारतीय शेतकऱ्यांसाठी चिंतेच्या प्रमुख बाबी आहेत. नावीन्यपर्ण ॲग्री-सोल्युशन्स (कृषी समाधान) हाच ह्यातून सुटकेचा मार्ग आहे आणि अलीकडेच बाजारात आणलेले ‘महाधन क्रॉपटेक’ खत म्हणजे कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे,ज्यामुळे कांद्याच्या पिकात १०% हून अधिक वाढ नोंदवली आहे.
‘महाधन क्रॉपटेकच्या’ मधून  कांद्याच्या पिकासाठी आवश्यक असलेले सर्व मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म पोषक अन्नद्रव्ये पुरविली जातात. ‘महाधन क्रॉपटेक’ ला  कांद्याचे पीक सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते त्या संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रगतिशील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
श्री.भाऊसाहेब किसन गोपाळे गाव- जवळा, ता.- पारनेर, जि.-अहमदनगर, म्हणाले “महाधन क्रॉपटेक हे खत वापरल्याने कांदा पिकाची जोमदार वाढ व एकसारख्या आकाराचे गोल कांदे मिळाले आणि उत्पादनही वाढले तसेच कांद्याची साठवण क्षमता देखील वाढली. महाधन क्रॉपटेक मुळे कांदा पिकास संतुलित पोषण मिळाल्याने माझा एकरी खतांवरील खर्च देखील कमी झाला,’’
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे चे माजी कुलगुरू डॉ. के. ई.लवांडे यांनीही महाधन क्रॉपटेकचा आढावा घेतलेला आहे. ‘‘रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले असून तिचा सातत्याने ऱ्हास होत आहे. म्हणून कांद्याच्या पिकाची उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच निसर्गाला हानी न पोहोचवणारे समाधान उपयोगात आणण्याची तातडीची गरज आहे. म्हणून ‘महाधन क्रॉपटेक’ द्वारे कांद्याच्या वाढीव उत्पादनासाठी आवश्यक मात्रेच्या साह्याने समतोल पोषक अन्नद्रव्ये पुरविले जातात”.
श्री. नरेश देशमुख, ईव्हीपी आणि मुख्य – सेल्स आणि मार्केटिंग (सीएनबी), ‘महाधन क्रॉपटेक’ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे आनंदी आहेत.‘‘एसटीएल शेतकऱ्यांसोबत नेहमीच उभी राहिलेली आहे. कांद्याचे पीक घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याची गरज असेल तेव्हा ते मिळेल. शेतकरी बांधवांच्या  कल्याणासाठी सतत काम करण्याची आमची तयारी आहे.