महानगर पालिकेच्या पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा आडमुठेपणा

पाणी प्रश्नी नागरिकांचे उपायुक्तांना निवेदन

नगर — लाल टाकी सिद्धार्थ नगर येथील भागात पाणी प्रश्न बिकट बनला आहे . या भागातील पालिकेचा पाणी सोडणारा कर्मचारी हा मनमानी कारभार करत असून वेळी-अवेळी पाणी सोडत आहे.  त्यामुळे या भागातील महिला  खूप त्रस्त झालेल्या आहेत.  त्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या प्रभागातील पोपट पाथरे व माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर महानगर पालिकेवर मोर्चा काढला.

यावेळी महिलांनी व नागरिकांनी पालिकेच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.  तसेच उपायुक्त पठारे यांना निवेदन देऊ त्यांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या . यावर उपायुक्तांनी त्यांना समस्या लवकरात लवकर सोडून असे आश्वासन दिले . तसेच पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटला नाही तर येत्या पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक अनिल शेकटकर यांनी दिला .  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ ,सचिव नितीन भुतारे, संतोष साळवे, पोपट पाथरे व या प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या.