माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

नगर — कोरोना महामारीचा काळात प्रशासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध निर्बंध लादले होते . त्यामुळे विविध उत्सवांवर ,कार्यक्रमांवर निर्बंधे  होती , याच पार्शुभूमीवर दोन वर्षांपासून गणेश जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत होती ,परंतु  कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा  काळात कोरोनाचा कमी झालेला प्रभाव आणि संसर्ग पाहता प्रशासनाने निर्बंधात शिथिलता केली.  त्यामुळे या वर्षी   शहरात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी होत आहे 
माघी गणेश जयंती निमित्त अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरास आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येत आहेत . तसेच कोरोना चे  सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.