माजी महापौर सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून जुनी मनपा ते पंचपीर चावडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

विशेष लक्ष देऊन शहरातील रस्ते चांगले करण्यावर भर - महापौर रोहिणी शेंडगे

शहराचा विकास व्हावा, यासाठी सर्वच पदाधिकारी, नगरसेवक प्रयत्नशील असतात. त्यासाठी शासनाकडे प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन निधीची मागणी करुन ती मंजुर करत असतात. प्रशासकीस पातळीवर या प्रक्रियेस वेळ लागत असतो. परंतु कायम पाठपुरावा करुन ती मंजुर करण्याचे काम आम्ही सर्वच करतो. त्यामुळेच विविध भागातील अनेक कामे मार्गी लागत आहेत. गेल्या पावसाळ्यात शहरातील रस्ते खराब झाल्यामुळे आता रस्त्याच्याबाबत विशेष लक्ष देऊन शहरातील रस्ते चांगले करण्यावर भर दिला आहे. सुरेखा कदम महापौर असतांना त्यांनीही शहराच्या विकासासाठी अनेक कामे मार्गी लावली, त्यांच्या काळातील काही कामे अजूनही प्रलंबित आहेत, ते आता आपण मार्गी लावू, असे आश्वासन महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.

माजी महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केलेल्या जुनी मनपा ते पंचपीर चावडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेविका सुरेखा कदम, माजी नगरसेवक संजय शेंडगे, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, अरबाज बागवान, उजेर सय्यद, नईम जहागिरदार, समीर बागवान, कासम शेख, इम्रान सय्यद, वसिम शेख, अशफाक शेख, इकबाल तांबोळी, अलफेज बागवान, सौफियन बागवान, समशेख खान, भोला पठाण, गुड्डू खान, अबुसलिम सय्यद, आसिफ पटवा, रसिक कोठारी, चाफे, झेंडे, आदि उपस्थित होते.

याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, आपण महापौर असतांना शहराच्या प्रत्येक भागातील विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला व कामे मार्गी लावली. त्यातून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. निधी अभावी काही कामे प्रलंबित राहील. परंतु निधीसाठी कायम पाठपुरावा केल्याने ती कामे आता मार्गी लागत आहे. त्यामुळे प्रभागाच्या विकासातील आपले योगदान कायम राहिल, असे सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. अरबाज बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर नईम जहागिरदार यांनी आभार मानले .