‘माळेगावचे दादा’ पुन्हा एकदा अजित पवारच!
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनेलचा प्रचंड विजय!

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री नीलकंठेश्वर पॅनेल ने एकहाती सत्ता मिळवत जोरदार विजय मिळवला आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसला असून अवघी एक जागा त्यांना मिळवता आली आहे.
निकाल संक्षेप :
- नीलकंठेश्वर पॅनेल – २० जागा
- सहकार बचाव पॅनेल (चंद्रराव तावरे) – १ जागा
या निकालात शरद पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी कष्टकरी समिती पॅनेल ला सभासदांनी सपशेल नाकारले.
रंजन तावरे यांचा आरोप :
“आजचा पराभव आमच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय नाही, परंतु नैतिकतेच्या मार्गाने विजय मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ जाऊन शिकावं लागेल. अजित पवार यांनी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून आणि दबावतंत्र वापरून सभासदांना वेठीस धरलं. माळेगावमध्ये लक्ष्मीचा वर्षाव झाला. विजय नैतिकतेला धरून नाही.”
तावरे यांचे अजित पवारांना आवाहन :
“तुम्ही सभासदांना ५ वर्षे जास्त भाव देण्याचा शब्द दिला आहे, तो पाळावा.”
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. मात्र विरोधकांचा नैतिकतेवर प्रश्नचिन्ह ठेवणारा आरोपही चर्चेत राहणार हे निश्चित!