महाराष्ट्राच्या वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिलासा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!

राज्यातील वीज ग्राहकांना अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वरून मोठी घोषणा करत सांगितले की, पहिल्या वर्षी 10% आणि पुढील 5 वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 26% वीजदर कपात होणार आहे! महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या याचिकेवर दिलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.
फडणवीस काय म्हणाले?
“राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदर कमी करण्यासाठी महावितरणने याचिका केली आणि त्यावर एमईआरसीने निर्णय दिला. याचा लाभ घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना होणार आहे. राज्यातील १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ७०% ग्राहक आहेत. त्यांना १ जुलैपासून थेट १०% दरकपात होईल. मध्यमवर्गीय घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहकांना १ ते ३% दरकपात होईल.”
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर
“आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीशीर वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या कामाला वेग आला आहे. तसेच हरित ऊर्जा खरेदीमुळे वीज उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे, त्यामुळेच दर कपात शक्य झाली आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्य मुद्दे :
१ जुलैपासून १०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्यांना १०% दर कपात
५ वर्षांत एकूण २६% दर कपात
घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना दिलासा
हरित ऊर्जेवर भर, खर्चात बचत
राज्यातील वीज ग्राहकांसाठी ही खरीच ऐतिहासिक आणि दिलासा देणारी घोषणा आहे.