मैदाने खेळण्यासाठी सुरु करा

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनेक निर्बंध शिथिल होत आहेत .  यात मैदाने ,व्यायामशाळा , स्विमिंग पूल बंद करण्यात आले आहेत . मात्र निर्बंधात शिथिलता येत असताना सर्व मैदाने सुरु करावेत अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे . 
 
निवेदनात म्हटले आहे कि , सध्याचा परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे . कोरोनात प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे . त्यासाठी नियमित व्यायाम , मैदानी खेळ अत्यंत गरजेचे आहेत , वास्तविक नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे . त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे   यासाठी शहरातील मैदाने खेळण्यासाठी सुरु करण्यात यावे असे म्हटले आहे .