युवकांमध्ये विविध ब्रॅण्डेड वस्तूंची चलती -आ. संग्राम जगताप

सर्जेपूरा येथे लुक फाईन इंटरप्राईजेसचा शुभारंभ

नागरिकांचे राहणीमान उंचावले असून, युवकांमध्ये विविध ब्रॅण्डेड वस्तूंची चलती आहे. सोशल मिडीयामुळे मोबाईलची क्रेझ वाढली असून, लुक फाईन इंअरप्राईजेसच्या माध्यमातून एका छताखाली ग्राहकांना विविध सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सर्जेपूरा येथील लुक फाईन इंटरप्राईजेसच्या नुतन दालनाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, लुक फाईनचे संचालक नदिम वारसी, फरजान शेख, हाजी जैनुद्दीन शेख, फरिद सय्यद, मुदस्सर शेख, साहिल शेख, रेहान शेख, विपुल वाखुरे पाटील आदी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, होतकरु युवकांनी व्यवसायात येऊन इतर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या. एक व्यवसाय उभा राहिल्यास त्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात. युवकांनी एकत्र येऊन लुक फाईनच्या माध्यमातून सुरु केलेली ए टू झेड सर्व्हिस निश्‍चित नगरकरांच्या पसंतीस उतरेल, असे त्यांनी सांगितले.
लुक फाईन इंटरप्राईजेसच्या शुभारंभाप्रसंगी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. लुक फाईन इंअरप्राईजेसच्या माध्यमातून हज उमरा टुर्स, जुने चार चाकी वाहन खरेदी विक्री, रियल इस्टेट, डेव्हलपर्स, कन्ट्रक्शन सर्व्हिसेस, तसेच सर्व कंपन्यांचे मोबाईल, ब्रॅण्डेड, घड्याळ, गॉगल्स, अत्तर, विविध इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.