रावसाहेब पटवर्धन पतसंस्था घोटाळा

त्यांना पोलिसानी केली अटक, न्यायालयाने धाडले तुरुंगात

तब्बल अडीचशे ठेवीदारांच्या ठेवी हडप करून 65 कोटींचा मोठा आर्थिक घोटाळा करणार्‍या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या चार संचालकांना अखेर अटक झाली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडले. दोन डिसेंबर पर्यंत त्यांची रवानगी आर्थिक गुन्हे शाखेच्या तुरुंगात करण्यात आली आहे.या अपहार प्रकरणात बॅंकेच्या माजी चेअरमन श्रीमती लतिका नंदकुमार पवार, माजी संचालक सुहास रेखी, हेमंत जाधव, प्रकाश सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत़.नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिवंगत नंदकुमार पवार यांच्या पत्नी लतिका पवार यांना अटक झाल्याने राष्ट्रवादी कोन्ग्रेस च्या गोटात खळबळ उडाली आहे.
 या आरोपींना 5 वे याअर्थ तदर्थ न्यायाधीश बी के पाटील यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अर्जुन पवार यांनी युक्तिवाद केला. आरोपी 2003 पासून पतसंस्थेत संचालक आणि चेअरमन पदावर काम करीत आहेत. त्यांनी 241 ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्या आहेत. हा घोटाळा 65 कोटींच्या घरात आहे. तर दुसरीकडे त्यांनी 8  कोटी 76 लाख रुपयांचे असुरक्षित कर्ज वाटले आहे. 6 कोटी रुपये कर्ज रोखे फंडात उपनिबंधक यांची परवानगी नसताना पुन्हा गुंतवणूक करण्यात आले. तसेच तब्बल 6 कोटी रुपये पतसंस्थेत अपहार करून केवळ व्हाऊचर वर सही करून रोख स्वरुपात काढण्यात आले. त्यामूळे या गुन्ह्यांची माहिती घ्यावयाची असल्याने आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्याची मागणी वकील पवार यांनी केली. आरोपींच्या वतीने अॅड सतीश गुगळे यांनी युक्तिवाद केला.
आर्थिक गुन्हे शाखेला आमच्या अशील यांनी प्रत्येकवेळी तपासात सहकार्य केलेले आहे. पोलिसांनी तपास  केल्यानंतर हे प्रकरण खासगी फिर्यादीने न्यायालयामध्ये आले न्यायालयाने आरोपीना अटक  करण्याचा निर्णय दिला ,केवळ तो आदेश पूर्ण करण्याकरता पोलिसांनी हि कारवाई केली .पण आरोपींमध्ये श्रीमती लतिका पवार यांचा सह आजारी  वृद्ध समावेश  होता , त्यांचा अटकेसाठी न्याय दंडाधिकार्यांना माहिती देऊन त्यांचा कडुन  परवानगी घेणे  आवश्यक होते तसेच महिला आरोपीना सूर्यास्तापूर्वी  व सूर्यदयानंतर अटक करता येत नाही . असे असताना पोलिसांनी अटक केली असे आरोपींचा वकिलांचे म्हणणे होते त्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्ष राठोड यांनी सांगितले कि  महिला आरोपीस सूर्यास्ताचा ४ मिनिट पूर्वी अटक करण्यात आले ,तसेच आरोपींची केलेले गुन्हे हे फॉरेंसिक चाचण्या करून तपासून घेणतात आले आहे .त्यांचा गुन्ह्यामध्ये तथ्य आढळून आल्याने त्यांचे नावे  घेण्यात  आले आहेत आणि मेहेरबान कोर्टाचा आदेशाने अटकेची कारवाई करण्यात आल्याने हि बेकायदेशीर म्हणता येणार नाही त्यामुळे आरोपींची  रवानगी पोलीस कोठडीत करावी आणि जर आरोपीनी  प्रकृती अस्वस्तचचे कारण देऊन जर रुग्णालय मध्ये भरती होऊन पोलीस कोठडीची वेळ मारून नेली तर ते दिवस सोडून त्यांचा कोठडीत वाढ करून स्थानिक आर्थिक गुन्हे  शाखेचा ताब्यात द्यावे अशी मागणी केली . न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद  मान्य करून आरोपीना २ डिसेंबर पर्यंत ४  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे