राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शेवगाव तालुका कार्यकारिणी जाहीर.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाश भाऊ पोटे, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका राष्ट्रीय चर्मकार अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते मा.विष्णु कवडे साहेब यांची निवड,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.विष्णु पाठे, तसेच तालुका युवक अध्यक्ष पदी मा.महेश भाऊ शेवाळे यांची निवड झाली,तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शेवगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली..

यावेळी कैलास गांगरडे,राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब केदारे, युवक जिल्हा अध्यक्ष संतोष उदमले,, शुभम बनस्वाल,संजय परदेशी, महेश कवडे, सुरेश दिपखने, देविदास ताभेरे, रमेश बगैर, दादासाहेब सोनवणे,कुमार पाठे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश पोटे म्हणाले की मी जन आधार सामाजिक संघटनेच्या मार्फत जे सामाजिक कार्य केले असून त्या कामाची दखल घेत समाजामध्ये मला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल निश्चितच चर्मकार महासंघाच्या अनेक अडचणींना वाचा फोडून संघटना मजबूत करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचे कार्य करणार असल्याची भावना प्रकाश पोटे यांनी व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.