राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे निलंबित .

महाराष्ट्र्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का ) गुन्ह्यातील सागर भांड सह पाच जण राहुरी कारागृहातून  पळून गेले होते, या प्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे याना दिनांक ५  रोजी निलंबित करण्यात आले आहे . नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांनी या बाबत आदेश काढले आहेत  .
राहुरी येथील कारागृहात मोक्कातील आरोपी सागर भांड सह पाच जणांना ठेवण्यात आले होते . या आरोपींची कोठडी चे गज कापून पलायन केले . तीन आरोपीना दुसऱ्या दिवंशी पकडण्यातपोलिसांना  यश आले होते परंतु सागर भांड सह एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश  आले . या प्रकरणी चौकशी करून पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांचा सह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना नुकतंच निलंबित करण्यात आले होते . राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचा निलंबनाचा प्रस्ताव देखील नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक  शेखर यांच्याकडे पाठविला होता त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे .