लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास ४ वर्ष सक्तमजुरी

शेतजमिनीचा मोजणी संदर्भात शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमि अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ज्योती दत्तात्रय डफळ हिला मंगळवारी विशेष न्यायाधीश तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर वें यारलगड्डा यांनी लाचलुचपत कायद्या अंतर्गत दोशी धरून चार वर्षाची सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे .

या खटल्यात सरकारी पक्षाचा वचातीने विशेष सरकारी वकील अर्जुन बी पवार यांनी काम पहिले . नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील शेतकरी राजू वनाजी निमसे जमिनीचा मोजणीसाठी भूमी उपाधीक्षक कार्यालयात मोजणी शुल्क भरले होते . त्यानुसार मोजणी करून निमसे याना नकाशा देण्यात आला होता . मात्र नकाशावर असलेल्या निशाणी प्रत्यक्ष जमिनीवर देण्याबाबत निमसे यांनी मागणी केली होती . यासाठी डफळ हिने निमसे यांचा कडे १० हजार रुपयांची मागणी केली होती .याबाबत निमसे यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती . या विभागाने २१ जुलै २०१७ रोजी भूकरमाफक डफळ हिला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली होती . या प्रकरणात पोलीस निरीक्षक शाम पवरे यांनी अधिक तपस करून विशेष न्यायालयात दोषरोपत्र दाखल केले होते . खटल्यात सरकारी पक्षरतर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले होते . तापसी अधिकारी तक्रार व पंच यांचा साक्ष महत्वाचा ठरल्या . समोर आलेले साक्षी पुरावे तसेच सरकारी पक्षाचा वतीने ऍड पवार यांनी केलेला युक्तिवाद ग्रह धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली . या खटल्यात ऍड पवार याना लाचलुचपत विभागाचे पोलीस नाईक संध्या म्हस्के व सहायक फैजदार लक्ष्मण काशीद यांचे विशेष सहकार्य लाभले .