वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बेमुदत संक्रात बंद आंदोलन

जामखेड – – गेल्या वर्षापासून पासून सतत जामखेड नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाचे पगार, महिने – महिने मिळत नाहीत, सध्य स्थिती सफाई कर्मचार्‍यांचे पगार गेल्या 2 महिन्या पासून मिळाले नाहीत. यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बेमुदत संक्रात बंद आंदोलन अँड.अरुण जाधव यांच्या नेतृत्वा खाली जामरवेड नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी जामरवेड नगर परिषदेच्या समोर कर्मचार्‍याच्या समवेत आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपसरपंच जाधव, प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, ता. अध्यक्ष अतिश पारवे, विशाल पवार, अझहर काझी, मुख्यतार सय्यद,अजिनाथ शिंदे, किशोर मोहिते, मा. सरपंच अंकुश पवार , बाबाभाई शेख, इस्माईल शेख, अरुण डोळस, नामदेव जगदाळे, गणपत कराळे, राकेश साळवे, मोहन शिंदे, भिमराव चव्हाण , बाळासाहेब खेत्रे, बाळासाहेब काळे, सतिष डिसले,बंकट खैरे, उमेश राऊत, आण्णा लोखंडे, विजय गायकवाड, भारत गायकवाड, अमोल सदाफुले, मिलींद घायतडक, सुनिल राऊत , मंदा मोरे, सिंधुबाई सदाफुले, केशरबाई घायतडक, सिमा गायकवाड तसेच सर्व आरोग्य कर्मचारी,विद्युत कर्मचारी, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनास पाठिंबा शेतकरी संघटनेचे रावसाहेब खोत, कांग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात यांनी दिला.